मित्रहो,आपले गावाचे तलाठी यांचेकडून आपणास विविध प्रकारचे दाखले/प्रमाणपत्र दिले जात होते. सदर चे दाखले हे परंपरागत पद्धतीने म्हणजेच आधीच्या तलाठी यांनी दिले म्हणून पूर्वीपासून दिले जात होते. परंतु तलाठी यांचेकडून दिल्या जाणार्या या गैर महसूली दाखल्यांच्या कायदेशीरपणाबाबत मा.न्यायालयाकडून मुद्दा उपस्थित केला गेला. काही ठिकाणी तलाठी यांना न्यायालय,पोलिस स्टेशन च्या फेर्या माराव्या लागल्या. त्यामुळे जळगाव जिल्हा तलाठी संघाच्या ठरावानुसार तलाठी यांचेकडून देण्यात येणार दाखले शासनाच्या पुढील मार्गदर्शक सूचना येईपर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत. त्या दाखल्यांची यादी पुढे देत आहोत.
फत्तेपूर मंडळ ता.जामनेर जिल्हा जळगाव
Monday, April 16, 2018
मित्रहो,आपले गावाचे तलाठी यांचेकडून आपणास विविध प्रकारचे दाखले/प्रमाणपत्र दिले जात होते. सदर चे दाखले हे परंपरागत पद्धतीने म्हणजेच आधीच्या तलाठी यांनी दिले म्हणून पूर्वीपासून दिले जात होते. परंतु तलाठी यांचेकडून दिल्या जाणार्या या गैर महसूली दाखल्यांच्या कायदेशीरपणाबाबत मा.न्यायालयाकडून मुद्दा उपस्थित केला गेला. काही ठिकाणी तलाठी यांना न्यायालय,पोलिस स्टेशन च्या फेर्या माराव्या लागल्या. त्यामुळे जळगाव जिल्हा तलाठी संघाच्या ठरावानुसार तलाठी यांचेकडून देण्यात येणार दाखले शासनाच्या पुढील मार्गदर्शक सूचना येईपर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत. त्या दाखल्यांची यादी पुढे देत आहोत.
Thursday, April 5, 2018
गाव नकाशे
गाव नकाशा हा साधारणतः महसूली गावाच्या हद्दीत येणार्या जमीनीचे वेगवेगळ्या भूमापन क्रमांकात विभागणी दर्शविणारा आराखडा असतो. गाव नकाशे हे संचालक ,भूमी अभिलेख यांचे अखत्यारीत येणारी बाब असून ते जतन करणे व त्यात वेळोवेळी योग्य त्या सुधारणा करणे ही बाब भूमी अभिलेख विभागाशी संबंधित आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नकाशे जतन करण्यात येत आहे.
मौजे पळासखेडे प्र.न. व करमाड - (कृत्रिम पुनर्भरण) नकाशे
(टीप- करमाड येथील नकाशा हा गट योजनेनुसार येणार्या गट क्रमांकानुसार आहे. आज रोजी करमाड गावी सर्व्हे क्रमांकानुसार शिवार नकाशा आहे)
विधानसभा मतदार याद्या करमाड
आपला लोकसभा मतदार संघ रावेर ०४ असा असून विधानसभा मतदार संघ ०१९ जामनेर असा आहे.
सद्यस्थितीत दिनांक ०१/०१/२०१८ या अर्हता दिनांकावर आधारित आपल्या सजेतील करमाड गावाच्या मतदार याद्या आपणास पाहावयास मिळतील.त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
करमाड मतदार यादी भाग क्रमांक १
सद्यस्थितीत दिनांक ०१/०१/२०१८ या अर्हता दिनांकावर आधारित आपल्या सजेतील करमाड गावाच्या मतदार याद्या आपणास पाहावयास मिळतील.त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
करमाड मतदार यादी भाग क्रमांक १
विधानसभा मतदार याद्या पळासखेडे प्र.न.
आपला लोकसभा मतदार संघ रावेर ०४ असा असून विधानसभा मतदार संघ ०१९ जामनेर असा आहे.
सद्यस्थितीत दिनांक ०१/०१/२०१८ या अर्हता दिनांकावर आधारित आपल्या सजेतील पळासखेडे प्र.न. गावाच्या मतदार याद्या आपणास पाहावयास मिळतील.त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा-
पळासखेडेप्र.न. मतदार यादी भाग क्रमांक ३६
पळासखेडेप्र.न. मतदार यादी भाग क्रमांक ३७
पळासखेडेप्र.न. मतदार यादी भाग क्रमांक ३८

विधानसभा मतदार याद्या
मा. भारत निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली विधानसभा मतदार संघाच्या याद्या बनविण्यात येत असतात. सदर याद्यांमध्ये 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदार म्हणून समावेश करून घेणे,मयत वा स्थलांतरीत मतदारांची नावे वगळणे इ.कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Offecers -BLO) यांचेमार्फत मा.भारत निवडणूक आयोग यांचे आदेशाप्रमाणे पार पाडली जातात व या मतदार याद्या अद्ययावत ठेवल्या जातात.
दरवर्षी साधारणतः सप्टेंबर/ऑक्टोबर महिन्यात विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रनिहाय मूळ प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात येतात. त्यावर हरकती व दावे मागविले जातात. दरवर्षीच्या १ जानेवारी या अर्हता दिंनांकास वय वर्ष १८ पूर्ण होणार्या व्यक्तींची नावे समाविष्ट करणे, मयत वा स्थलांतरीत मतदारांची नावे वगळणे इ.कामे पूर्ण झाल्यानंतर साधारणतः ५ जानेवारी रोजी अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यात येतात.
मतदार यादीच्या पहिल्या पानावर मतदार संघाचा तपशील,पुनरीक्षणाचा तपशील,यादीच्या हद्दीचा तपशील,स्त्रीपुरुष निहाय मतदार संख्या तसेच शेवटच्या पानावर एकूण मतदार संख्येचा गोषवारा दिलेला असतो. प्रत्येक मतदाराने दरवर्षी प्रारूप याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आपले व आपल्या कुटुंबातील मतदार सदस्यांची नावे यादीमध्ये आली आहेत याची अवश्य खात्री करून घ्यावी. कारण इतर सर्व निवडणूकांच्या (ग्रामपंचायत/जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपंचायत,नगरपरिषद इ.) मतदार याद्या या याच विधानसभा याद्यांवरुन तयार केल्या जात असतात.आपला लोकसभा मतदार संघ रावेर ०४ असा असून विधानसभा मतदार संघ ०१९ जामनेर असा आहे.
उत्पन्न अहवाल
मित्रहो,आपल्याला
माहितच आहे की,शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणेकामी,विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामी,तसेच सरकारी
नोकरीसाठी अर्ज करणार्या उमेदवारांना उत्पन्नाचा दाखला आपल्या गावाचे तलाठी
यांचेकडून प्राप्त करून घेणे आवश्यक असते. सदर उत्पन्नाचा दाखला हा आता उत्पन्न
अहवाल या नावाने ओळखला जातो.
सदरचा उत्पन्न अहवाल तलाठी यांचेकडून प्राप्त करून
घेण्यासाठी आपल्याला तलाठी यांचेकडे विशिष्ट
नमुन्यात अर्ज करावा लागेल. त्यासोबत आपले आधारकार्ड/किंवा कोणतेही एक ओळखपत्राची नक्कल
जोडून अर्जावर अर्जदाराचा एक पासपोर्ट आकाराचा
फोटो चिकटवावा लागेल. अर्ज संपूर्ण सुवाच्य अक्षरात भरून तलाठी यांचेकडे जमा केल्यानंतर
तलाठी आपण अर्जात दिलेल्या माहितीची पडताळणी करून त्यांचेकडील अहवाल तयार करतील. सदर
अहवाल मिळाल्यानंतर अर्जदार यांना आपल्या तालुक्याचे
तहसील कार्यालय येथे किंवा नजीकच्या महा ई-सेवा केंद्रावर जाऊन तहसिलदार यांचेकडील
उत्पन्नाचा दाखला प्राप्त करता येऊ शकेल.
आपले सुविधेसाठी उत्पन्न अहवाल मिळविणेसाठीचा अर्ज खाली दिला असून तो
डाउनलोड करून प्रिंट काढून वापरता येईल.
Subscribe to:
Posts (Atom)