Thursday, April 5, 2018

विधानसभा मतदार याद्या





मा. भारत निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली विधानसभा मतदार संघाच्या याद्या बनविण्यात येत असतात. सदर याद्यांमध्ये 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदार म्हणून समावेश करून घेणे,मयत वा स्थलांतरीत मतदारांची नावे वगळणे इ.कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Offecers -BLO) यांचेमार्फत मा.भारत निवडणूक आयोग यांचे आदेशाप्रमाणे पार पाडली जातात व या मतदार याद्या अद्ययावत ठेवल्या जातात.

दरवर्षी साधारणतः सप्टेंबर/ऑक्टोबर महिन्यात विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रनिहाय मूळ प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात येतात. त्यावर हरकती व दावे मागविले जातात. दरवर्षीच्या १ जानेवारी या अर्हता दिंनांकास वय वर्ष १८ पूर्ण होणार्‍या व्यक्तींची नावे समाविष्ट करणे, मयत वा स्थलांतरीत मतदारांची नावे वगळणे इ.कामे पूर्ण झाल्यानंतर साधारणतः ५ जानेवारी रोजी अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यात येतात.

मतदार यादीच्या पहिल्या पानावर मतदार संघाचा तपशील,पुनरीक्षणाचा तपशील,यादीच्या हद्दीचा तपशील,स्त्रीपुरुष निहाय मतदार संख्या तसेच शेवटच्या पानावर एकूण मतदार संख्येचा गोषवारा दिलेला असतो. प्रत्येक मतदाराने दरवर्षी प्रारूप याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आपले व आपल्या कुटुंबातील मतदार सदस्यांची नावे यादीमध्ये आली आहेत याची अवश्य खात्री करून घ्यावी. कारण इतर सर्व निवडणूकांच्या (ग्रामपंचायत/जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपंचायत,नगरपरिषद इ.) मतदार याद्या या याच विधानसभा याद्यांवरुन तयार केल्या जात असतात.
आपला लोकसभा मतदार संघ रावेर ०४ असा असून विधानसभा मतदार संघ ०१९ जामनेर असा आहे.











No comments:

Post a Comment