मित्रहो,आपले गावाचे तलाठी यांचेकडून आपणास विविध प्रकारचे दाखले/प्रमाणपत्र दिले जात होते. सदर चे दाखले हे परंपरागत पद्धतीने म्हणजेच आधीच्या तलाठी यांनी दिले म्हणून पूर्वीपासून दिले जात होते. परंतु तलाठी यांचेकडून दिल्या जाणार्या या गैर महसूली दाखल्यांच्या कायदेशीरपणाबाबत मा.न्यायालयाकडून मुद्दा उपस्थित केला गेला. काही ठिकाणी तलाठी यांना न्यायालय,पोलिस स्टेशन च्या फेर्या माराव्या लागल्या. त्यामुळे जळगाव जिल्हा तलाठी संघाच्या ठरावानुसार तलाठी यांचेकडून देण्यात येणार दाखले शासनाच्या पुढील मार्गदर्शक सूचना येईपर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत. त्या दाखल्यांची यादी पुढे देत आहोत.
No comments:
Post a Comment